बीड (रिपोर्टर) रेशन दुकानावर मिळणारे धान्याचे वितरण दिवाळीच्या अगोदर तात्काळ व सुरळीत करून गोरगरीबांची दिवाळी साजरी करण्यास मदत करा अशा सुचना आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातंर्गत येणार्या बीड व शिरूर (का.) तहसिलदार यांना केल्या आहेत.
पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानावर मिळत असलेले धान्य दिवाळीच्या अगोदर गोरगरिबांच्या घरात पोहचले तर, त्यांची दिवाळी चांगली साजरी होईल. धान्य वितरणाच्या कामात अनियमितता आल्याने ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होता कामा नये. तसेच यासंदर्भात कसल्याही प्रकारची तक्रार येऊ नये याची काळजी घ्या. बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड ग्रामीण तसेच शिरूर (का.) भागात धान्य वितरण सुरळीत आणि तात्काळ करा अशा प्रकारच्या सुचना दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर (का.) तहसिलदारांसह संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.
जिल्हा परीषद समोरील मैदानातून भव्य रॅलीला सुरुवात होईल. ती रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड मार्गे जैन भवन याठिकाणी जैन भवन येथे व जाहीर सभेला सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कामगार नेते कॉ. डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस कॉ. एम. एच. शेख, हिमाचल प्रदेशचे कामगार नेते कॉ. जगतराम, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात, कॉ. प्राचार्य ए. बी. पाटील, कॉ. मिरा शिंदे, के. रघु, मधुकर मोकळे, पी.एस. घाडगे, डी.बी. बोर्डे, बी.जी. खाडे, मोहन जाधव, रोहीदास जाधव यांनी संबोधित करतील.