Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआष्टीत ऍन्टीजन टेस्टसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज टेस्टकडे व्यापार्‍यांनी फिरवली पाठ

आष्टीत ऍन्टीजन टेस्टसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज टेस्टकडे व्यापार्‍यांनी फिरवली पाठ


दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही व्यापारी व कामगारांनी प्रतिसाद दिला नाही
आष्टी (रिपोर्टर):- कोरोना या विषाणूचा उद्रेक वाढू लागल्याने वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक ऍन्टीजन टेस्ट करण्यासाठी आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम व तालुका आरोग्य विभाग यांनी गुरुवारी व्यापार्‍यांची बैठक घेऊन सर्व व्यापा-यांनी दोन दिवसात आष्टी शहरात दोन ठिकाणी आयोजन केलेल्या कॅम्पसमध्ये टेस्ट करण्याचे आवाहन केले होते. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत एकही व्यापारी व कामगार या कॅम्पकडे न फिरकल्याने या आवाहनाकडे व्यापार्‍यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मास्क न लावणारांना दंडात्मक कारवाई करा त्यांना कोरोनाबाबतचे नियम सांगा जनजागृती करा एवढ्यावर जर जाणूनबुजून कोणी दुर्लक्ष करुन मनाप्रमाणे वागत कोरोनाची नियमावली पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवा असे सांगत व्यापा-यांनी दोन दिवसांत कोरोनाची अन्टीजन टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याने सर्वांनी टेस्ट करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी आष्टी तहसील कार्यालयात गुरुवारी प्रशासन व व्यापारी यांची कोरोनाबाबत एक आढावा बैठक संपन्न झाली यावेळी केले होते.आष्टी शहरात शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी व शनिवार दि.२७ फेब्रुवारी रोजी कन्या प्रशाला शाळा खडकत रोड आष्टी व जिल्हा परिषद शाळा मुलांची आष्टी (पोलीस स्टेशन शेजारी) येथे न्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून व्यापारी व कामगारांनी आज दि.२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकही व्यापारी कामगार टेस्टसाठी आले नसून आरोग्य यंत्रणा सकाळी ९ वाजेपासून सज्ज झाली होती.परंतु व्यापा-यांनीच ऍन्टीजन टेस्टकडे पाठ फिरवली आहे.जिल्हा परिषद शाळा पोलिस स्टेशन रोड या कॅम्पसमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.आय.सय्यद,लॅब टेक्निशन पी.पी.देशमुख,बी.के.झगडे,आरोग्य सेवक तात्या धोंडे, पी.आर.धस, आरोग्य सहायक एन. एस.गर्जे, आरोग्य सेवक के.एस.सय्यद,तर मुलींची कन्या शाळा कॅम्पसमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जयचंद नेलवाडे,आरोग्य सेवक पारेकर पंढरीनाथ,दिगंबर ओंगाळे, कारंडे नागेश,संतोष आठरे,आरोग्य सहाय्यक एस.एम. वाळके,वाळेकर दिपक आदी कर्मचारी कार्यरत होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!