Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमनर्सला ८१ हजाराला फसवलं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले

नर्सला ८१ हजाराला फसवलं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले

बीड (रिपोर्टर)ः- आम्ही बँकेतून बोलतो, तुमचं एटीएम कार्ड बंद झालं, तुमचा पासवर्ड बदलला यासह अन्य काही बाही बोलून नागरीकांची ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. असे फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. शासकीय रुग्णालयातील एका परिचारीकेची अशाच पध्दतीची फसवणूक करुन ८१ हजार रुपयाला चुना लागल्याचे समोर आले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात तक्रार करण्यात आली.
गेल्या काही महिन्यापासून ऑनलाईन फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. बँकेच्या नावाखाली एटीएम किंवा पासवर्डचे नाव सांगून काही बदमाश नागरीकांची फसवणूक करुन आर्थीक लूट करतात. जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या संगीता वनवे नावाच्या परिचारीकेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. त्यांच्या खात्यातून दोन वेळेस पैसे कट झाले. त्यात त्यांची ८१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी शिवाजी नगर पोलीसात तक्रार दाखल केली. अशा पध्दतीच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहे.मध्यंतरी एटीएममधून फ्रॉड करणारी टोळी गजाआड करण्यात पोलीसांना यश आलेले होते

Most Popular

error: Content is protected !!