Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडपिपिआर सदृश आजाराने मेंढयांना ग्रासले

पिपिआर सदृश आजाराने मेंढयांना ग्रासले

शेळी मेंढपालकात घबराट
बीड (रिपोर्टर)ः- कोरोना महामारीच्या साथीने लोकात घबराट असतांनाच गेल्या एक वर्षापासून जनांवरांनाही कोणत्यां कोणत्या साथीच्या आजाराने ग्रासलेले दिसून येते. बीड तालुक्यातील अंथरववण पिंप्री या ठिकाणी बैल,गायी यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आजही माजलगांव तालुक्यातील काही गावात शेळ्या मेंढया या पिपिआर सदृश आजाराने आजारी पडले आहे. त्यामुळे या पशु मालकात घबराट निर्माण झाली आहे.
या आजारामुळे शेळ्या मेंढ्यांना ताप येतो, त्यांच्या नाकातून पाणी गळते आणि हा आजार जास्त बळावल्यास प्रसंगी शेळी किंवा मेंढीचा मृत्यु होतो. हा आजार साथीचा संसगृजन्य असल्याने एका शेळी किंवा मेंढीला आजार झाला की, इतरही शेळ्या मेंढ्याना हा आजार होतो. या आजारावर उपचार करण्यासाठी शासकीय पशु संवर्धन विभागाला तिन वर्षात एकदा डोस येतात. तर खाजगी औषध विक्रेताकडे ही एक लस पाचशे रुपये इतक्या मोठ्या किंमतीला असल्यामुळे पशू मालकही ही लस प्रतिकार लस म्हणून देण्यासाठी टाळाटाळ करतात.
आजही माजलगांव तालुक्यातील काही गावामध्ये अशा आजाराची लक्षणे शेळ्या मेंढयांना दिसू लागले आहे.खाजगी पशू वैद्यकीय अधिकारी आणि औषध विक्रेते हा आजार पिपिआर साथीचा आजार आहे असे म्हणतात. तर पशु संवर्धन विभागातील पशु वैद्यकीय अधिकारी असे म्हणतात की असा काही आजार आलेला नाही मात्र अशा आजार सदृश लक्षणे शेळ्या किंवा मेंढ्यांना दिसत असतील त्यामुळे आम्ही तपासून बघू असे सांगतात.तर आजार कोणता का असेना मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात छोटे छोटे शेतकरी एक जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे त्यांचा कल आहे. मात्र या आजारामुळे त्यांच्यामध्ये घबराहट निर्माण झाली आहे. एक तर कोरोनामुळे रोजगार हिरावून गेला आहे. लॉकडाऊन लागण्याची चिन्हे आहेत. त्यातही शेळ्या मेंढ्याना असा आजार झाला तर आर्थीक नुकसान होण्याची मोठी भिती या पशुपालकामध्ये आहेत.

Most Popular

error: Content is protected !!