Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाउद्या नेकनूरचा बाजार दोन ठिकाणी भरणार

उद्या नेकनूरचा बाजार दोन ठिकाणी भरणार

भाजीपाल्यासाठी बाजार तळात जागा; जनावरांचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरणार
नेकनूर (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन दक्ष होत आहे. उद्या नेकनूरचा आठवडी बाजार असल्याने या बाजारामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला. एकत्रित बाजार भरण्याऐवजी जनावरांचा एकीकडे आणि भाजीपाला, फळ व धान्याचा बाजार दुसरीकडे भरवण्यात येणार आहे. कपडे, चप्पल, भांडे व इतर साहित्यांचा बाजार मात्र भरवण्यात येणार नसल्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. याची दखल संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतची दक्षता घेतली. नेकनूर येथे रविवारी आठवडी बाजार भरतो, उद्याच्या आठवडी बाजारामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला. एकत्रित बाजार भरण्याऐवजी दोन ठिकाणी वेगवेगळे बाजार भरवण्याचा निर्णय नेकनूर ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने घेतला. जनावरे व शेळीचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तर भाजीपाला व कडधान्याचा बाजार नेहमीच्याच ठिकाणी भरवण्यात येणार आहे. कपडे, चप्पल, भांडे व इतर वस्तूंचा बाजार भरवण्यात येणार नसल्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला असून याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही ग्रा.पं.ने केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!