Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात आढळले ७७ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आढळले ७७ पॉझिटिव्ह

गेवराईत ३४, अंबाजोगाईत १५ बीड तालुक्यात आढळले ११ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर)ः- जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढू लागला असून काल गेवराई तालुक्यातील एका महानुभव पंथाच्या आश्रमातील २९ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आज आरोग्य विभागाला ७७९ संशयीतांचा अहवाल सादर झाला असून यामध्ये गेवराई ३४, अंबाजोगाईत १५ आणि बीड तालुक्यात ११ पॉझिटिव्ह आले असून इतर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. यामध्ये महानुभव पंथाच्या आश्रमातील २९ रुग्णांच्या आकड्याचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने काल ७७९ संशयीतांच्या अहवाल तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा रिपोर्ट आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ७०२ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह मध्ये माजलगांव -३, केज-६, बीड-११, आष्टी-६, अंबाजोगाई-१५, गेवराई- कालचे २९ आणि आजचे ५ असे मिळून ३४ पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!