Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोल्हेरमध्ये २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आ. पवारांनी घेतली आरोग्य विभागाची बैठक

कोल्हेरमध्ये २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आ. पवारांनी घेतली आरोग्य विभागाची बैठक


गेवराई (रिपोर्टर)- कोल्हेरच्या एका आश्रमात २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आज आ. लक्ष्मण पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. या वेळी अधीक्षक डॉ. चिंचोलकर, डीवायएसपी राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


कोल्हेर येथील आश्रमात २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या संदर्भात आज आ. लक्ष्मण पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या. या बैठकीला अधीक्षक डॉ. चिंचोलकर, डॉ. संजय कदम, डीवायएसपी राठोड, राजेश शिंदे, आंधळे, सराफ यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, धोंडराई, पांचाळेश्वर, मानमोळीसह गेवराई शहरातील दत्त मंदिर येथील नागरिकांच्या तपासण्या करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

केजमध्ये महिनाभर करणार व्यापार्‍यांची अँटीजेन चाचणी
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून तालुका पातळीवरील आरोग्य प्रशासन दक्ष झाले आहे. केज येथे आज २७ फेब्रुवारी ते २७ मार्च एक महिनाभर शहरासह ग्रामीण भागातील व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मेंढके, तालुका आरोग्य अधिकारी आठवले यांनी दिली आहे. टेस्ट केल्याशिवाय व्यापार्‍यांनी आपले दुकान सुरू करू नये, असेही तहसीलदारांनी बजावले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!