Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमतलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफीयावर कारवाई

तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफीयावर कारवाई

२६ लाख २५ हजाराचा
मुद्देमाल जप्त

गेवराई (रिपोर्टर)ः- तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असून रात्री एस.पी.च्या विशेष पथकाने वाळू माफीयांवर कारवाई करुन तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याची जणु पावतीच दिली. रात्री एका हायवासह एक लोडर्स असा एकुण २६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरीकांकडून होत आहे. रात्री पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या विशेष पथकाला तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्ीतील गंगावाडी येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पथक प्रमुख ए.पी.आय. विलास हजारे यांच्यासह पो.कॉ. बासटेवाड, मोरे, राऊत, भिल्लारे यांची धाड टाकली असता त्याठिकाणी एक हायवा आणि एक लोडर मिळून आले. पोलीसांनी ते जप्त करुन तलवाडा पोलीस ठाण्यात मालक चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!