Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडमहाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचे बीडमध्ये आंदोलन

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचे बीडमध्ये आंदोलन


संजय राठोडांच्या पुतळ्याला जोडे मारले
बीड (रिपोर्टर)- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित वनमंत्री संजय राठोड यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप करत राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा म्हणत बीड जिल्हा भाजपाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत संजय राठोड यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळ्याचे दहन करण्यात आले. हे आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर झाले.
आज सकाळी बीड जिल्हा भाजपाच्या वतीने पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आणि त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या जिल्हा कार्यालयासमोर वनमंत्री संजय राठोड यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करत सदरच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्यातले महाविकास आघाडी सरकार वनमंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. या वेळी जगदीश गुरखुदे, किरण बांगर, डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. देशमुख, मुंडे, लताताई बुंदिले, अनिता जाधव, भूषण पवार, बालाजी पवार, नागेश पवार, कपिल सौदा, दत्ता परळकर, विलास बावणे, अमोल वडतिले, विलास सातपुते, कल्याण पवार, शाम कोटुळे, बाळासाहेब घोलप, गणेश तोडकर, बद्रिनाथ जटाळ, महेश सावंत, शरद बडगे, प्रल्हाद चित्रे आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!