Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeराजकारणसंजय राठोड राजीनामा देणार?; शिवसेना नेते संजय राऊतांचं सूचक ट्विट

संजय राठोड राजीनामा देणार?; शिवसेना नेते संजय राऊतांचं सूचक ट्विट

मुंबई (रिपोर्टर):-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चेनं राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं बोललं जात असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपानं मागणी लावून धरली असून, विधिमंडळाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, अधिवेशानाच्या पूर्वीचं निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना दिल्याचं वृत्त आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहे.

Most Popular

error: Content is protected !!