Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनालोकाहो, कोरोना पाय पसरतोय, सहा दिवसात पाच जणांचा मृत्यू

लोकाहो, कोरोना पाय पसरतोय, सहा दिवसात पाच जणांचा मृत्यू


आज ४३ नवे बाधीत तर सहा दिवसात ३२८
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या सहा दिवसांच्या कालखंडात जिल्ह्यात तब्बल ३२८ जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही दिसून येत आहे. आज १ हजार १९२ संशयितांपैकी ४३ जण कोरोना बाधीत म्हणून आढळून आले आहेत. गेल्या सहा दिवसांचा कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्हावासियांनी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क नियमितपणे वापरावेत.

corona 7 1

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या आठ दिवसांपुर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून आला होता. मात्र पुन्हा राज्यातील काही शहरात कोरोनाने उद्रेक केला. बीड जिल्ह्यातही रोज कोरोनाचा आकडा वाढताना दिसून येत आहे. काल १ हजार १९२ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता ४३ कोरोना बाधीत आढळले. गेल्या सहा दिवसांच्या कालखंडात तब्बल ३२८ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ हजार ४५५ एकूण रुग्ण होते, आज हा आकडा १८ हजार ७८३ वर जावून पोहचा असून २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात कोरोनाने एकूण ५७३ जणांचा मृत्यू झाला होता. काल हाच मृत्युचा आकडा ५७७ वर जावून पोहचल्याने या सहा दिवसात जिल्ह्यात चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोना आपले पाय पसरवत असल्याने जनतेने शासनाच्या नियमाचे पालन करावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!