Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमकागदपत्र तपासणीचे कारण पुढे करत ट्रक चालकाचे 85 हजार रुपये पळविले

कागदपत्र तपासणीचे कारण पुढे करत ट्रक चालकाचे 85 हजार रुपये पळविले


अंबाजोगाई (रिपोर्टर):- ट्रकचे मूळ कागदपत्र तपासायचे आहेत, असे म्हणत मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ट्रक चालकाकडील कागदपत्रांची बॅग हस्तगत करत त्यामधील 85 हजार रुपये घेऊन बॅग ट्रक चालकाच्या अंगावर रिकामी बॅग फेकून पसार झाल्याची ही लुटीची घटना अंबाजोगाई-लातूर रोडवर काल भर दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   उत्तर प्रदेशातील बनवारीलाल शर्मा हा चालक आपली ट्रक (क्र. आर.जे. 11 जी.बी. 2037) ही गाडी घेऊन लातूर येथून निघाला असता अंबाजोगाई-लातूर रोडवर कोपले पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने त्यांच्या गाडीला रोखले गाडीचे कागदपत्र तपासायचे आहेत, असं म्हणत त्या अज्ञात तीन चोरट्यांनी कागदपत्रांची मागणी केली. बनवारीलाल शर्मा यांनी कागदपत्रांची बॅग हातात घेतली. त्या वेळी चोरट्यांनी ती बॅग हिसकावून घेत बॅगेमधील भाडेपोटी आलेले 85 हजार रुपये काढून घेत रिकामी बॅग ट्रक चालकाच्या अंगावर फेकून हे चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. जेव्हा ट्रक चालकाच्या लक्षात ही बाब आली तेव्हा त्याने तात्काळ अंबाजोगाई पोलिसात या प्रकरणाची तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात 392 कलमा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास पीएसआय सावंत हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!