Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडवीज कंपनीचा आता जि.प., न.प., ग्रा.पं.ला शॉक बसणार थकित बील न भरल्यास...

वीज कंपनीचा आता जि.प., न.प., ग्रा.पं.ला शॉक बसणार थकित बील न भरल्यास विजेचे कनेक्शन होणार कट


बीड जिल्ह्यात 41 कोटींची थकबाकी
बीड (रिपोर्टर):- वीज वितरण कंपनीने थकित बिलासाठी कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे कनेक्शन कट करण्यात आले. आता विज कंपनीने आपला मोर्चा नगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडे वळवला. पाणी पुरवठ्याच्या थकबाकी न भरणार्‍यांचे कनेक्शन कट करण्यात येणार असून जिल्ह्यात 41.15 कोटींची थकबाकी आहे. संबंधितांनी तात्काळ आपली थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.


   गेल्या एक वर्षापासून कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांनी विज बील भरलेले नव्हते. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणने वीज बिलाच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली. राज्यातील हजारो शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले. आता महावितरणने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणी पुरवठ्याची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी न भरणार्‍यांना आता वीज वितरण कंपनी कनेक्शन तोडण्याचा शॉक देणार आहे. बीड जिल्ह्यात एकूण पाणी पुरवठ्याचे 1261 विजेचे कनेक्शन आहेत. यांच्याकडे 41.15 कोटींची थकबाकी आहे. ज्यांनी ज्यांनी बाकी थकवली त्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. संबंधितांनी वेळीच विज बील भरावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले. दरम्यान ही मोहीम अवघ्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. मराठवाड्यात एकूण 551 कोटींची थकबाकी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!