Monday, April 19, 2021
No menu items!
Home बीड आष्टी बिबट्यानंतर आता आष्टी तालुक्यात गव्याची दहशत

बिबट्यानंतर आता आष्टी तालुक्यात गव्याची दहशत


कर्‍हेवाडी शिवारात वनविभाग दाखल, पावलाच्या ठशांवरून गवा असल्याचे निष्पन्न; रात्री काही शेतकर्‍यांना दिसला गवा
आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यामध्ये मध्यंतरी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. नरभक्षक बिबट्याने तिघा जणांचा बळी घेता होता. यामुळे अवघ्या आष्टी मतदारसंघात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यानंतर आता गव्याची भीती निर्माण झाली आहे. कर्‍हेवाडी शिवारात रात्री साडेअकरा वाजता काही शेतकर्‍यांना गवा दिसून आला. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाने आज सकाळी कर्‍हेवाडी शिवारात येऊन ठशांची पाहणी केली. या ठशांवरून गवाच असल्याचे निष्पन्न झाले. या गव्याच्या भीतीपोटी परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागले. वनविभाग घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

3a


     या भागात विषेश लक्ष ठेवून आहे.गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे.या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी वनरक्षक मातावळी एन.के.काकडे,वनरक्षक आष्टी डी.जे.चव्हाण,चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.  दोन दिवसांपूर्वी शेजारील तालुका असलेल्या जामखेड येथील वंजारवाडीचे शेतकरी संतोष दराडे यांना गव्याने हल्ल्यात जखमी केले आहे.वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून या ठिकाणी रात्रीचा गस्त वाढवण्यात यावा, अशी माहिती राम नागरगोजे यांनी दिली.
वनविभागाचे नागरिकांना सतर्क
राहण्याचे आवाहन – शाम सिरसाठ
पोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये शिरला असून गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र जमून मागे न लागता गोगांटा टाळावा गव्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे वनविभागाची गाडी पेट्रोलिंग करेल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.पाळीव प्राण्यांसह नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी केले.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...