Monday, April 19, 2021
No menu items!
Home देश विदेश ‘अच्छे दिन’चा भपका! गॅस भाववाढीचा भडका गॅस पुन्हा 25 रुपयांनी महागला, महिन्यात...

‘अच्छे दिन’चा भपका! गॅस भाववाढीचा भडका गॅस पुन्हा 25 रुपयांनी महागला, महिन्यात चार वेळेस गॅसची दरवाढ


कुठायत राजकीय पक्ष, संघटना आणि पत्रकबहाद्दर
सर्वसामान्यांच्या घराघरात महागाईच्या भस्मासुराचा धुडगूस

बीड (रिपोर्टर)- अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या केंद्रातील भाजपा सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असून दररोज पेट्रोल-डिझेलची भाववाढ होत असतानाच गेल्या महिनाभराच्या कालखंडात गॅसच्या दरवाढीने उच्चांक गाठला असून आज पुन्हा तब्बल 25 रुपयांनी विना अनुदानित गॅसची दरवाढ केल्याने देशभरातील सर्वसामान्य माणसांच्या घराघरात महागाईचा भस्मासूर तांडव करत आहे. दुसरीकडे प्रचंड प्रमाणात इंधनाची दरवाढ होत असताना विरोधी पक्षांसह कुठल्याही मुद्यावर थयथयाट करणार्‍या राजकीय, सामाजिक संस्था मोदी सरकारच्या तुघलकी निर्णयाविरुद्ध ब्र शब्द काढत नाहीत, त्यामुळे केंद्रातलं सरकार हुकूमशहा असल्यागत पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ रोखत नाही. परिणामी देशभरात महागाईचा आगडोंब उसळत आहे.
   फेब्रुवारी महिन्यात एक नाही दोन नाही तर चौथ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. याअगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपये आणि गेल्या आठवड्यात पुन्हा 25 रुपये वाढ करण्यात आली होती. एक महिन्यात शंभर रुपयांनी गॅसची दरवाढ झाल्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर 794 वरून 819 रुपयांवर जावून पोहचलं आहे. तर बीडमध्ये विनाअनुदानित सिलेंडर 820 वरून थेट 845 वर जावून पोहचला आहे, ते घरामध्ये आणेपर्यंत 860 ते 900 रुपयापर्यंत जात आहे. गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही 25 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे. इंधनाची दरवाढ सातत्याने होत असल्याने देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. ‘अच्छे दिन’ची गुहार देणारे आणि अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारच्या कार्यकाळात रामराज्य तर सोडा रावणाच्या राज्यापेक्षाही भयावह अवस्था महागाईमुळे होत आहे. केंद्र सरकार महागाई आणि बेरोजगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरत असून जात-पात-धर्म-पंथ भावनिक मुद्यांवर राजकारण करत मूळ प्रश्‍नापासून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यात हातखंडा असलेल्या मोदी सरकारच्या या महागाई धोरणाविरोधात आक्रमक होण्यास विरोधी पक्ष एकीकडे कुचकामी ठरत असताना दुसरीकडे कुठल्याही मुद्यावर उठसूट आंदोलने, उपोषणे आणि पत्रकबाजी करणार्‍या वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक पक्ष-संघटना आणि संस्था इंधन दरवाढीसह महागाईच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची हुकूमशाही राजवट सर्वच क्षेत्रात फोफावत आहे

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...