Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमहॅकर वॉर सेक्स टॉर्शन एक भयानवास्तव

हॅकर वॉर सेक्स टॉर्शन एक भयानवास्तव

हॅकर वॉर सेक्स टॉर्शन एक भयानवास्तव

2021 03 01 p32021 03 01 p3 1

मोबाईल हॅकच्या प्रमाणात वाढ, भुरटे हॅकर आपल्या प्रोफाईच्या आधारावर नवीन आयडी तयार करून पाठवतात फ्रेंड रिक्वेस्ट; मित्राची प्रोफाईल पाहून दोस्ती एक्सेप्ट करतात आणि सुरू होतो हॅकरचा गेम
बीड जिल्ह्यात हॅकरच्या जाळ्यात शेकडो मोबाईल हॅक, तगडी पार्टी पाहून संबंधित व्यक्तीचा अभ्यास करून करतात मोबाईल हॅक; बीडचे अनेक डॉक्टर, मुख्याध्यापक, समाजसेवकांचे मोबाईल हॅक
मोबाईल हॅक करून आपल्या मित्रासोबत करतात चॅट, चॅट करता-करता करतात उसणे पैशाची मागणी; मित्राला फोन पे नंबर देवून ऑनलाईन पैसे पाठविण्यात सांगतात, सावधान असे कॉल आले तर मित्रांना फोन लावून पैसे त्या मित्रानेच मागितले का? सहनिशा करा
बीड जिल्हा रूग्णालयातील परिचारीकेला ऑनलाईन 81 हजाराचा गंडा, बोगस कस्टमरकेअर सेंटरच्या नावावर झाली लूट; लूट झाल्यावर अवघ्या काही मिनिटातच वेस्ट बंगालच्या एका एटीएममधून त्या व्यक्तीने काढले पैसे, फेक ट्रुकॉलर अ‍ॅप डाऊनलोड केल्याने फेक कॉलवर कस्टमर केअर असे नाव लिहून आल्याने ग्राहक ओरिजनल कॉल समजून आडकतात जाळ्यात
पाच महिन्यात बीड जिल्ह्यात ऑनलाईन फ्रॉडचे 54 प्रकरण दाखल, मोबाईल ग्राहकांना ऑनलाईन 22 लाखाचा गंडा, पीआय गायकवाड यांनी लावला अनेक प्रकरणाचा तपास; काही प्रकरणात सायबर पोलीसांनी केली रिकव्हरी, सायबरचे कार्य अभिनंदनीय
हॅकरची कामे करणारी तरूण मुले बेरोजगारीमुळे जातात आहारी, बीड सायबर पोलीसांनी एटीएम क्लोन प्रकरणी अटक केलेले हॅकर फक्त दहावी पास; त्या बिहारच्या तरूणांनी युट्युबवर पाहून केले एटीएमचे क्लोन तयार, क्लोन डिव्हाईस तयार करण्यासाठी पार्ट वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑनलाईन मागविले
पुर्वी सायबर सेल नावाने या विभागाची सुरूवात करण्यात आली होती आणि क्राईम ब्रँच काम पाहत होते, नंतर 2016 साली सायबर पोलीस ठाणे स्वतंत्र्य दर्जा देण्यात आला परंतू मनुष्यबळ कमी व आस्थापना तयार नसल्याने अनेक अडचणींचा करावा लागतो सामना
अनेक मोबाईल ग्राहक मोबाईलला पासवर्ड ठेवत नाहीत, जर पासवर्ड ठेवला तर आपली जन्म दिनांक, मोबाईल नंबर किंवा 1234 असे ठेवतात; सोप्या पासवर्डमुळे मोबाईल हॅक करणे सोपे
सेक्स टॉर्शनच्या जाळ्यास अडकलेले अनेक जण हानी ट्रॅपचे बळी, ऑनलाईन केलेल्या चुकीमुळे दहशतीखाली जगण्याची वेळ; बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात अनेक प्रकरण दाखल
स्वत:च्या चुकीमुळे अनेक ग्राहक गप्प, ब्लॅकमेलरला बळी पडून अनेक पिडित व्यक्तींचा होतो छळ; सेक्स टॉर्शनचे सत्य जाणुन घेण्याची गरज, चूक झाली असेल तर सायबर पोलीस ठाण्यात खबर द्या; सायबर पोलीस आपल्यासाठी सदैव तत्पर, घाबरू नका, ब्लॅकमेल होवू नका किंवा चुकीचे पाऊल उचलू नका
फेब्रुवारी 22 रात्री 8 ची वेळ बीड जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत तांदळे आपल्या घरी बसले होते. अचानक त्यांच्या मोबाईलची बेल वाजली… हॅलो दादा तुम्हाला काही पैशाची गरज आहे का?… अभिजीत तादंळे मोबाईलला हातात घेवून कोणाचा फोन आला पुन्हा एकदा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून मोबाईलवर बोलले. नाही रे भैय्या… का असे अचानक विचारतोस… उस्मानाबादच्या मोहिते नावाच्या अभिजीत तांदळे यांच्या मित्राने लावला होता फोन… दादा तुम्ही मॅसेज पाठवला ना? तो मॅसेज वाचल्यानंतर दादाला अचानक पैशाची गरज का पडली? म्हणून मला शंका वाटली आणि मी दादा तुम्हाला फोन लावला… अभिजीत तांदळे अचंबीत झाले, मोहितेला संबोधून बोलले, मी तर असा काही मॅसेज पाठवला नाही… दादा मी तुम्हाला त्या मॅसेजचे स्क्रीनशॉट पाठवतो… दादा तुमचा मोबाईल हॅक झाला वाटतो…अभिजीत तांदळे यांच्या डोक्यात साय…साय… वारे फिरू लागले… पट दिशीने मोबाईल बंद करून मोहिते यांच्या स्क्रीनशॉटची वाट पाहू लागले… स्क्रीनशॉट पाहता अभिजीत तांदळे यांच्या पायाखालची वाळू सरकली… काय करावे काही सूचेना… मोबाईल चॅटमध्ये हॅकरने अभिजीत तांदळे यांची प्रोफाईल फोटो लावून मॅसेज पाठवला होता. कैंसे हो, मोहितेंनी उत्तर दिले ठिक हूँ सर.. तथाकथीत तांदळे यांनी मॅसेज पाठवला आपसे एक छोटासा काम था… मोहिते बोलले बोलो… हिंदीमध्ये चॅट सुरू होते… मोहिते यांना हिंदी पाहूनच शंका झाली होती… तरी चॅट सुरू होती… पुन्हा त्या व्यक्तीचा मॅसेज आला…अर्जंट कुच पैसो की जरूरत हैं… मॉर्निंगमे 10 बजे रिटर्न हो जायेंगे… मोहिते यांनी फक्त सर… असा मॅसेज पाठवला… समोरून व्यक्तीने फोन पर ट्रान्सफर्मर करना हैं… असा मॅसेज पाठवला… त्यावेळी मोहिते यांनी ठिक हैं तुम्हारा नंबर भेजो… त्या व्यक्तीने एक फोन पे नंबर पाठवला… चॅट बंद झाले… आणि मोहिते यांनी भावनिक न होता थेट अभिजीत तांदळे यांच्याशी वरील संवाद साधून तांदळे यांना स्क्रीनशॉट पाठवला. तो स्क्रीनशॉट घेवून तांदळे थेट बीड सायबर ठाण्यात गेले. तेथील पोलीस निरीक्षक आर.एस.गायकवाड यांनी पुर्ण हकीकत जाणून घेतली. सर्व प्रथम अभिजीत तांदळे यांनी आपल्या मोबाईलवरून सर्व मित्रांना माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या अकाऊंटवर कोणीही पैसे वगैरे टाकू नका.. मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिलेली आहे. हे प्रकरण छोटे असले तरी या संदर्भात दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने सायबर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून माहिती गोळा केली. गेल्या पाच महिन्यात 54 पेक्षा अधिक गुन्हे ऑनलाईनचे बीड जिल्ह्यात घडले असल्याची माहिती मिळाली. तसेच या 54 प्रकरणात मोबाईल ग्राहकांना 22 लाख रूपयाचा गंडा लागल्याचीही माहिती समोर आली असून बीड सायबर यांनी काही प्रकरणात रिकव्हरी करून ग्राहकांना दिलासाही दिला आहे. विशेष म्हणजे 2004 साली सायबर सेल नावाने या विभागाची सुरूवात करण्यात आली होती आणि क्राईम ब्रँच या विभागाचे कामकाज पाहत होते. 2016 साली ऑनलाईनचे वाढते गुन्हे लक्षात घेता सायबर सेलचे रूपांतर सायबर पोलीस ठाण्यात केले. सध्या समोरा समोर गुन्हे घडण्यापेक्षा ऑनलाईन गुन्हेच जास्त घडत आहेत. सायबर पोलीस ठाणे नामांतर झाले असले तरी कमी मनुष्यबळ व आस्थापना तयार नसल्याने संबंधित ठाणे येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अभिजीत तादंळे यांचे प्रकरण ताजे असतांनाच या प्रकरणाची फिर्याद दाखल होवून 24 तासही झाले नाही की, पुन्हा बीड शहरात जिल्हा रूग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला ऑनलाईन 81 हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला. या संदर्भात पुन्हा सायबर ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून ऑनलाईन क्राईममध्ये भयानक वाढ झालेली दिसून येत असून सध्या संपुर्ण जगात हॅकर वॉर (युद्ध) सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षाही भयंकर वास्तव म्हणजे सेक्स टॉर्शन ऑनलाईन सुरू असलेला गेम जे की, संबंधीत व्यक्तीचे आयुष्यच बरबाद करून टाकतो. किंवा त्या व्यक्तीला ब्लॅकमेलरच्या बळी पडावे लागते. यामागचे सत्य जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मोबाईल ग्राहकांनो चुक झाली असेल तर घाबरू नका सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करा. सायबर पोलीस आपल्या पाठिशी सदैव आहे. ऑनलाईन चूक झाली असेल तर चुकीचे पाऊल उचलू नका सायबर ठाणे तात्काळ तुम्हाला मदत देवू शकते. परंतू इज्जती खातीर अनेक लोक गप्प बसून ऑनलाईन सोशन सहन करत आहेत. यामुळे ऑनलाईन क्राईममध्ये भयानक वाढ होत असून आता मोबाईल ग्राहकांनी ऑनलाईन फ्रॉर्डच्या बळी न पडता सायबर ठाणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.
गेल्या पाच महिन्यात सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन क्राईम झालेले 54 प्रकरण दाखल झाले. ज्या आर्थी अनेक ग्राहकांनी गंडा बसूनही तक्रार दिली नाही यांची संख्या या 54 पेक्षाही जास्त आहे. परंतू झालेले विसरून जा असे समजून अनेक मोबाईल ग्राहक ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतरही तक्रार देत नाहीत. परंतू काही असे गंभीर प्रकरण असतात की, ब्लॅकमेलींगच्या बळी पडून अनेक मोबाईल ग्राहक त्रस्त होतात आणि शेवटी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देतात. सुरूवातीलाच जर सायबर पोलीसांची मदत घेतली तर ब्लॅकमेलींगही झाली नसती. परंतू इज्जती खातीर अनेक मोबाईल ग्राहक ऑनलाईन फ्रॉडच्या बळी पडतात. चुक झाली असेल तर झाली, काही घाबरण्याचे काम नाही. कोणी ब्लॅकमेल करत असेल तर समोर या, समाजात आपली बाजु शेअर करा परंतू अनेक जण ऑनलाईन फ्रॉड सहन करून जीवन जगतांना दिसतात. पैशाचा फटका बसलेला सहन होतो परंतू इज्जत जावू नये हा महत्त्वाचा भाग आहे. परंतू गेल्या दोन महिन्यापासून सेक्स टॉर्शन नावाचे हानी ट्रॅप सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या सेक्स टॉर्शनमध्ये ऑनलाईन अश्‍लिल चाळे स्वत: करणे आणि समोरच्या मोबाईल ग्राहकालाही अश्‍लिल चाळे करण्यास भाग पाडणे. नंतर त्या व्यक्तीशी दोस्ती करून त्याचा व्हाटसअ‍ॅप नंबर घेणे. नंतर तो अश्‍लिल व्हिडीओ त्या व्यक्तीला व्हाटसअ‍ॅपवर पाठवून ब्लॅकमेलींगची धमकी देणे हे अत्यंत भयानवास्तव असून सेक्स टॉर्शनचे सत्य समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. सेक्स टॉर्शनचा गेम सुरू होतो फेसबुकचे फेक अकाऊंट तयार करून. सेक्स टॉर्शन मधून होणारी ब्लॅकमेलींग अत्यंत भयानक आहे. जो व्यक्ती या सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकलेला आहे, त्याची पार्श्‍वभूमी पाहिली असता त्या व्यक्तीचे संपूर्ण परिवार या अश्‍लिल व्हिडीओमुळे बरबाद होवू शकते. म्हणून अनेक जण सेक्स टॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेल होतात. परंतू सेक्स टॉर्शनची चुक झाली असेल या संदर्भात कोणी आपल्याला ब्लॅकमेलींग करत असेल तर घाबरू नका, थेट सायबर पोलीसांना आपली चूक सांगा, सहानुभूतीपुर्वक आपल्याला न्याय मिळेल, आपली चूकही माफ होईल, सायबर सेल आपल्या पाठिशी ठाम उभे आहे. दै.रिपोर्टरने केलेल्या सर्व्हेक्षणात फेक फेसबुक अकाऊंट किंवा आपल्या प्रोफाईल फोटोच्या माध्यमाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दोस्ती करतात. प्रोफाईल पाहून आपणही त्या मित्राची दोस्ती कबुल करतोत.परंतू ऑनलाईन फ्रॉडची हीच सुरूवात आहे. दररोज बीड शहरात पाहिले तर 10-20 लोकांना ऑनलाईन फ्रॉडचा फटका बसतो. परंतू कोणी समोर येत नाही. म्हणूनच ऑनलाईन फ्रॉड वाढलेले आहे. यासाठी सायबर पोलीस सदैव तत्पर असून सायबर पोलीस टीममध्ये येथील कर्तव्यदक्ष अधिकारी आर.एस.गायकवाड, पीएसआय खुळे, निशीगंध, नाचण, आसेफ शेख, अनिल डोंगरे, संतोष म्हेत्रे, दराडे, अविनाश गवळी, सुनिता शिंदे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. 24 तास सायबर ठाणे आपल्यासाठी उघडे असते. विशेष म्हणजे तक्रारदाराला चांगल्या प्रकारची वागणुक या ठाण्यातून मिळते.

बोगस अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सुरू होतो गेम
बीड जिल्हा रूग्णालयातील परिचारीका यांनी आपल्या मोबाईलवर जो ट्रु कॉलर अ‍ॅप डाऊनलोड केला होता तो अ‍ॅपच संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. कारण की, ज्या आठ अंकी मोबाईल नंबरने संबंधित परिचारीका यांना कॉल आले होते. त्या कॉलवर कस्टमर केअर म्हणून लिहून आले होते. कस्टमर केअर असल्याने संबंधित परिचारीकेने विश्‍वास करून संबंधित व्यक्ती जे काही बोलतो त्याची अंमलबजावणी केली. त्या व्यक्तीने संबंधित परिचारीकेला एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. परिचारीकेने सांगितलेले अ‍ॅप डाऊनलोड केले आणि सुरू झाल गेम. संबंधित व्यक्तीने डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून संंबंधित परिचारीकेच्या मोबाईलला रिमोटने हँडल केले आणि काही क्षणातच 81 हजार रूपये संबंधित परिचारीकेच्या अकाऊंटमधून त्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले. विशेष म्हणजे संबंधित परिचारीकेच्या मोबाईलमध्ये ट्रुकॉलर अ‍ॅप होता तर मग बोगस कॉल कसे आले? हे सर्व प्रकरण पाहिले असता बोगस अ‍ॅप डाऊनलोड केल्यानेच कांड झालेले दिसून येत आहे.
ऑनलाईन पार्ट मिळत असल्याने
हमखास ऑनलाईन कोणतीही वस्तु मिळत असल्याने आता मोबाईल ग्राहकांना इतर फिरण्याची गरज पडत नाही. कोणतेही पार्ट ऑनलाईन मिळत असल्याने तांत्रिक फ्रॉड होत आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी बिहारच्या काही तरूणांनी एटीएमचे क्लोन तयार करून बीड येथील एकाला ऑनलाईन गंडा दिला होता. या प्रकरणी सायबर ठाण्याचे गायकवाड यांनी व त्यांच्या टिमने मेहनत घेवून बिहार येथून 4 आरोपींना ताब्यात घेवून मोठी कामगिरी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ऑनलाईनचे गुन्हेगार जाळ्यात अडकले. या तरूणाकडून मिळालेली माहिती अत्यंत भयानक असून बेरोजगारीच्या आहारी पडून त्या तरूणांनी हे कांड केल्याची माहिती दिली. यात युट्युब पाहून एटीएमचे डिव्हाईस तयार करण्यासाठी विविध ठिकाणाहून विविध पार्ट ऑनलाईन मागून घेतले. त्यानंतर क्लोन तयार करून एटीएममधून पैसे काढणे असे काम सुरू केले. ज्या अर्थी युट्युब पाहून किंवा ऑनलाईन पार्टस मागून असे कांड होत असतील तर जोपर्यंत कांड होणार नाही तोपर्यंत प्रशासनाला खबरच लागणार नाही यासाठी अशा काही व्हिडीओ जे की, समाजासाठी घातक आहेत असे व्हिडीओवर बंदी आणण्याची गरज आहे तसेच ऑनलाईन पार्टस मिळविण्यासाठीही काही बंधन असणे गरजेचे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!