Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाधक्कादायक -कोरोनालस घेतलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांना कोरोनाची लागण

धक्कादायक -कोरोनालस घेतलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांना कोरोनाची लागण

बीड (रिपोर्टर):- आठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही

गेल्या 20 दिवसापासून राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहेत. त्यानुषंगाने राज्य शासनासह प्रशासन व आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असून कोरोना बाबतची लसीकरण मोहिमही राज्यभरात सुरू आहे. बीडमध्ये सर्व प्रथम आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचार्‍यांना कोरोना लसीचा लाभ मिळाला. गेल्या आठरा दिवसापूर्वी म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी कोरोनाची लस घेतली. मात्र ही लस घेतल्यानंतरही सोमवारी त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी अँटीजेन टेस्ट केली असता रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!