Monday, April 19, 2021
No menu items!
Home राजकारण डीसीसीतील भाजपाच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली

डीसीसीतील भाजपाच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली


सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेकडे सर्वांचे लक्ष

बीड (रिपोर्टर):- विद्यमान सहकार मंत्र्यांच्या सहकार कक्षेतील प्रकरण त्यांच्यासमोर चालवण्यात येऊ नये व सहकारमंत्र्यांनी निकाल दिल्यानंतर आम्हाला पंधरा दिवसांचे प्रोटेक्शन द्यावे, या बाबतची याचिका बीडमधील भाजपाच्या पाच ते सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. मात्र सदरची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्याने आज विद्यमान सहकारमंत्री हे धनराज राजाभाऊ मुंडे यांच्या 2015 च्या प्रकरणात काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संस्था मतदारसंघातून बँकेच्या उपविधी नियमावर बोट ठेवून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्वचे सर्व 87 उमेदवारी अर्ज बाद केले होते. बँकेच्या उपविधी नियमात ज्या संस्थेचे ऑडीट ‘अ’ अथवा ‘ब’ आहे अशांनाच निवडणूक लढवता येते. मात्र गेल्या पाच वर्षांपुर्वी या निमयाला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती कायम समजत बीडमधील भाजपाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मात्र कायदेशीरपणे त्यांचे अर्ज उडवले. त्या उपविधीतील नियमाबाबतच धनराज मुंडे यांचे सहकार मंत्र्यांच्या कक्षेत एक प्रकरण सुरू आहे. उपविधीतील हे नियम काढून टाकण्यात यावेत, याबाबत आज विद्यमान सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या न्याय कक्षेत या प्रकरणावर निर्णय लागणार आहे, परंतु सत्ताधारी पक्ष आमच्या विरोधात निकाल देईल म्हणून धनराज मुंंडे यांच्यासह अन्य चार जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल एक याचिका दाखल केली. या याचिकेत  या याचिकेत विद्यमान सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत हे प्रकरण चालू नये अथवा निकाल दिल्यानंतर आम्हाला पंधरा दिवसांचे संरक्षण द्यावे, असे म्हटले होते, मात्र ही याचिका आज फेटाळून लावल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी हा महत्वपुर्ण विषय ठरत आहे.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...