Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमतीन हजाराची लाच घेताना तलाठी पकडला

तीन हजाराची लाच घेताना तलाठी पकडला


आष्टी (रिपोर्टर):- शेती वाटणी पत्राद्वारे नावे करण्यासाठी लाचखोर तलाठ्याने लाच मागितली. तीन हजार रुपये घेताना तलाठ्यास आज दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कालच एका अधिकार्‍याला लाच घेताना पकडण्यात आले नाही तोच आज लाचखोरीची दुसरी घटना घडली.


   बाळु महादेव बनगे (रा. मुर्शदपूर ता. जि. बीड) हे आष्टी तालुक्यातील मोराळे सज्जाला तलाठी म्हणून कार्यरत आहेत. बनगे यांनी शेती वाटणी पत्राद्वारे नावे करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. आज दुपारी तीन हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या टिमने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!