Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमऊसतोड महिलेला मुकादमाकडून बेदम मारहाण

ऊसतोड महिलेला मुकादमाकडून बेदम मारहाण

बीड (रिपोर्टर)- जेवण नंतर कर, आताचे आता ऊस भरण्यासाठी चल, असे म्हणत मुकादमाने आणि त्याच्या मुलाने ऊसतोड मजूर महिलेला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना टाकरवण शिवारातील पारधी वस्ती शिवाराजवळ घडली असून या प्रकरणी पोलीसात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमा माणिक घोले (रा. खांडवी ता. गेवराई, ह.मु. टाकरवण पारधी वस्ती) ह्या ऊसतोड मजूर असून त्यांच्या कोपीत भाकरी करत असताना तेथे मुकादम लिंबाजी वक्ते व त्याचा मुलगा आप्पा सुंदर वक्ते (दोन्ही रा. जातेगाव ता. गेवराई) हे आले व तू आताच गाडी भरण्यासाठी चल, तुला आम्ही पैसे दिलेत, असे म्हणून तिला शिवीगाळ करत आप्पा वक्ते याने त्याच्या हातातील कोयता महिलेच्या डोक्यात मारून दुखापत केली. या वेळी फिर्यादीचा पती माणिक घोले भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यांना देखील सुंदर वक्ते याने काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून तिला बघून घेऊ, असे धमकावले. त्यांच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार कदीर हे खरत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!