Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडजलयुक्त शिवार पाठोपाठ आता ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची होणार चौकशी

जलयुक्त शिवार पाठोपाठ आता ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची होणार चौकशी

मुंबई (रिपोर्टर):- जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चौकशी सुरू केली असता त्यात बरच काही बाहेर निघत असताना आता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या सुमारे ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. आज सभागृहात वृक्ष लागवड योजनेसंदर्भात चर्चा झाली त्यावेळी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात वृक्षलागवड योजनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ’वृक्ष लागवड योजना फडणवीस सरकारची ड्रीम योजना होती. या योजनेत राज्यातील तिजोरीतून खर्च झाले, खासगी लोकांकडूनही पैसे गोळा करण्यात आहे. एक रोप किती रुपयाला पडलं, तसंच, कोणत्या रोपवाटिकेतून ही रोपं आणण्यात आली याचे सविस्तर उत्तर यात हवंय. हे ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी झालंय का? की हे प्रोजेक्ट भ्रष्टाचारातच गुंतलं आहे,? याची चौकशी व्हावी,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांच्या मागणीनंतर विधिमंडळाची समिती स्थापन करुन चौकशी केली जाईल, असं राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.

Most Popular

error: Content is protected !!