Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमजळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई (रिपोर्टर):- जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकार्‍यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार तेथे घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
जळगावमधील वसतीगृहात महिलांचे कपडे काढून त्यांना नृत्य करायला लावलं अशी काही घडली नाही अस अहवालात सिद्ध झालं आहे. वसतीगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेथे काही महिला गरबा खेळत होत्या. जळगावमधील रत्नमाला सोनार हिने तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, असं चौकशी समितीच्या अहवालात समोर आलं आहे. रत्नामाला ही वेडसर बाई आहे आणि हे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे चौकशीच्या अहवालात आलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. वसतीगृहात एकही पोलीस अधिकारी वसतीगृहात गेल्याची रजिस्टमध्ये नोंद नाही. महिलांचा व्हिडीओ काढला गेला, अशीही कोणती माहिती अहवालात समोर आली नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!