Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदी के.के. वडमारे यांची निवड

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदी के.के. वडमारे यांची निवड

बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदी बीड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते के.के. वडमारे यांची नियूक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी निवडीचे पत्र दिले. गेल्या अनेक वर्षांपासून के.के. वडमारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यांच्या या एकनिष्ठेचं त्यांना पक्षाने फळ दिलं. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदी त्यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, बीडचे आ.संदीप क्षीरसागर यांच्या शिफारशीनुसार त्यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी निवड केली. त्यांना निवडीचे पत्र मुंबई येथे प्रदेश कार्यालयात देण्यात आले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. के.के. वडमारे यांची सचिवपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!