Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडबालेपीरमध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा

बालेपीरमध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा

धरणात पाणी असताना पाणी पुरवठ्यास उशिरा का होतो? नगरसेवक आवाज का उठवत नाहीत
बीड (रिपोर्टर)- बीड शहरातील बहुतांश भागांमध्ये पाण्याचा पुरवठा वेळेवर होत नाही. पंधरा ते १७ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. दोन्ही धरणात पुरेसे पाणी असताना पाणी पुरवठ्याबाबत नगरपालिका हात का आखडता घेते असा प्रश्‍न उपस्थित होतो. याबाबत नगरसेवकही नगरपालिकेला जाब विचारत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. बालेपीरसह त्या भागातील परिसरात पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आठ दिवसाला पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र त्याची अमलबजावणी कुठेही करताना दिसून येत नाही. पंधरा ते सतरा दिवसआड बालेपीर भागामध्ये पाणी येते. माजलगाव आणि बिंदुसरा हे दोन्ही धरणे पुर्णत: भरलेले असताना पाणीपुरवठा करण्याबाबत नगरपालिका कंजुशीपणा का करत आहे? पाण्याअभावी नागरिकांचे हाल होतअ सून त्यांना इतर ठिकाणावरून पाणी आणावे लागते. नगरपालिकेला नगरसेवक पाण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा जाब विचारत नसल्यामुळेच नगरपालिका प्रशासन ढेपाळले असून सर्वसामान्य नागरिकांत न.प.च्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!