बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्युचा दरही कमी व्हायला तयार नाही. काल जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा दोघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज आलेल्या अहवालात ५७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
आरोग्य विभागाने काल ९४७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात ८९० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ५७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई ११, आष्टी ९, बीड २२, गेवराई ३, केज २, माजलगाव ३, परळी ३, पाटोदा १ आणि शिरूर तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले आहेत. तर गेवराई शहरातील एका ६० वर्षीय वृद्धाचा तर केज तालुक्यातील आडस येथील एका ५० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.