Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमअंबेवडगाव जवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात एक ठार

अंबेवडगाव जवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात एक ठार

किल्ले धारूर (रिपोर्टर ) -धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथे पहाटे तिन चे दरम्यान कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये ट्रक्टर चालका विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी खामगांव सांगोला रस्त्यावर अंबेवडगाव जवळ असलेल्या बायपास जवळ पहाटे तिन चे दरम्यान हा अपघात घडला. कार क्र.एम.एच. ११ बी.बी. ०१०२ हि काठेवाडी कडे जाणारी व ऊस घेवून तेलगाव कडून धारूर कडे येणारे जायडर कंपणीचे ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक झाली या मध्ये कार मधील युवक राहूल सुभाष मुंडे वय २२ वर्ष रा.काठेवाडी हा जागीच ठार झाला धारुर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचाली या प्रकरणी ट्रक्टर चालका विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पो हे का राठौड हे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!