Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लगतात एकरी ४ हजार रुपये

ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लगतात एकरी ४ हजार रुपये

शेतकर्‍यांची लूट होताना कारखानदार गप्प का?
सोमवारी कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन -थावरे

माजलगाव(रिपोर्टर)- ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांकडून एकरी दोन ते चार हजार रुपये घेऊन शेतकर्‍यांची पिळवणूक करत आहे. कारखानदार ऊसतोडणीचे पैसे कपात करून शेतकर्‍यांना उसाचे पैसे देतात. असे असतानाही मजूर शेतकर्‍यांकडून नेमके कशाचे पैसे घेतात, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत कारखानदार ठोस भूमिका का घेत नाहीत. शेतकर्‍यांची ही लूट थांबवण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली आहे. ऊसतोड मजूर शेतकर्‍यांकडून ऊसतोडणीसाठी एकरी दोन ते चार हजार रुपये घेतात. जे शेतकरी पैसे देत नाहीत अशा शेतकर्‍यांचा ऊस तोडला जात नाही. मजुरांना तोडणीचे पैसे कारखान्याकडून मिळतात. शेतकर्‍यांच्या उसातून मजुरांच्या तोडणीचे पैसे कपात होत असतानाही शेतकर्‍यांकडून अशा पद्धतीने पैसे घेतले जातात. यासंदर्भात जानेवारी महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांच्या एमडींची औरंगाबाद येथे सहायक संचालक (साखर आयुक्त) कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गंगाभीषण थावरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. यात कारखानदारांनी जनजागृती करून अलाउन्सिंग करून मजुरांना अशा पद्धतीची वाढीव रक्कम देऊ नये असे ठरले मात्र बीड जिल्ह्यातील एकाही कारखान्याने याची अमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवारी गंगाभीषण थावरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!