Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली गर्दी पाहून तहसीलदार स्वत: रस्त्यावर उतरले आणि दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. ज्या दुकानदारांनी अँटीजेन टेस्ट केली नाही अशा दहा दुकानदारांच्या दुकाना सील करून विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करत ८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. काल रात्रीच तहसीलदार स्वत: रस्त्यावर उतरल्याने अँटीजेन टेस्ट न केलेल्या अनेक दुकानदारांनी आपल्या दुकाना पटापट बंद केल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तहदीलदारांकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवडा भरापासुन प्रशासन कोरोनामुळे सतर्क झाले असून तलवाड्यात देखील आठवडी बाजारात जाऊन तहसिलदार खाडे ऍटिजन टेस्ट न केल्याने १० दुकानांना सील ठोकले होते. तालुक्यात संचारबंदी लागू असतांना प्रशासनाने याबाबत नियमअटी लागू करण्यात आल्या असतांना देखील काल बाजारात अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरत असताना तहसीलदार खाडे व नगरपरिषद मुख्याधिकारी धकड यांनी रस्त्यावर उतरत ४४ लोकांविरूद्ध कारवाई करत ८८०० रुपये चा दंड वसूल करण्यात आला, तहसिलदार यांनी रस्त्यावर उतरल्याने मास्क तसेच व्यापारी वर्गाने कोरोनाची चाचणी करावी नंतरच आपले व्यावसाय सुरू ठेवावेत असे आदेश पारीत करून देखील अनेक दुकानदारांनी अँटीजन तपासण्या न केल्यामुळे शहरातील शास्त्री चौक येथील १० दुकानांना सील ठोकले असून ही कारवाई तहसिलदार सचिन खाडे , मुख्याधिकारी उमेश ढाकणे, मंडळाधिकारी प्रकाश तांबे , तलाठी पाढंरे , तलाठी गोविंद ढाकणे, जित्तेद्र लेन्डाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी हनुमान जावळे,दत्ता चव्हाण,विशाल प्रधान व न.प.कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईच्या भितीपोटी आज गेवराई शहरातील अनेक दुकानदारांनी अँटीजन तापसण्या करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.
यापुढे एकही दुकानदार तपासणी न करता विनामास्क आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार सचिन खाडे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...