Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeराजकारणमुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मजीद शेख
बीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र जोरदार केले जाते. विरोधी मत व्यक्त करणारांना भाजपावाले टार्गेट करत आले आहेत. काल राज्यपालांच्या अभिभाषणाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिले. ठाकरे यांनी दणदणीत उत्तर दिले. जे जनतेच्या मनात आहे तेच ठाकरे बोलले. भाजपावाले ज्या प्रमाणे नाटकं करत आहेत. त्यांच्या नाटकाचा पर्दा फाडण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या धोरणाबाबत राज्याचे भाजपावाले काही बोलत नाही. भाजपाच्या नौटंकीला मुख्यमंत्र्यांनी धारेवर धरलं. उध्दव ठाकरे यांच्या भाषणामुळे ते खरे शिवसेनेचे वाघ दिसून येत होते.

कोवीडचा संसर्ग अजुन थांबलेला नाही. अशा अवस्थेत राज्याचं विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाषण केलं. त्याचं भाषण चांगलंच गाजलं. राज्यात आणि केंद्रात भाजपा कशा पध्दतीने काम करत आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. जे भाजपाच्या बाजुने असतील, त्यांच्या बाजुने बोलतील ते देशभक्त, जे विरोधात बोलेल त्यांना देशद्रोही ठरवण्याचा पयंडाच भाजपाने पाडला. केंद्राने कृषीचे तीन विधेयक आणले त्याच्या विरोधात गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलना बाबत भाजपावाले कुठलीही ठोस भुमिका घेत नाही. उलट आंदोलन करणारांना देशद्रोही ठरवून भाजपावाले मोकळे झाले. जे भाजपावाले शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवतात त्या भाजपावाल्यांना राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत बोलण्याचा काय अधिकार आहे? भाजपाने दिल्लीत शेतकर्‍यांचे पाणी, विज बंद केले. रस्त्यावर खिळे ठोकले हेच का भाजपाचं शेतकरी प्रेम असं ठाकरे यांनी भाजपाला बजावले. देशद्रोही बाबत ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाजपाला फैलावर घेतले. भाजपाची मातृसंस्था स्वातंत्र्य संग्रामात नव्हती. भारत माता की जय बोललं की देशप्रेम सिध्द होत नाही, असं म्हणुन ठाकरेंनी भाजपाची कान उघडणी केली. राजकारणात कशा घुरघोडी केल्या जातात. जम्मु काश्मिर व बिहारमध्ये सत्तेसाठी कशा पध्दतीची युती भाजपाने केली, याचा आरशा दाखवण्याचं काम ठाकरे यांनी केले. महागाई गगनाला भिडली असून इंधन, गॅसचे भाव रोज वाढत आहेत. या भाववाढीबाबत भाजपाचे लोक कुठलाही ब्र शब्द काढत नाही. लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, असं म्हणुन ठाकरे यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री ठाकरे हे काल लोकांच्या मनातील बोलले. जे लोकांना अपेक्षीत आहे तेच ठाकरे बोलले आहे. भाजपाच्या विखारी राजकारणावर कुणीतरी बोललं पाहिजे, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या विरोधात बोलण्यास सहसा कुणी पुढे येत नाही. शिवसेना नेहमीच खर्‍या शब्दाला जागत आली. शिवसेनेची भुमिका ही प्रखर राहिलेली आहे. कालचं ठाकरे यांचं भाषण लाईक करणारचं होतं. भले ही भाजपाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असतील पण ठाकरे खरं तेच बोलले.!

Most Popular

error: Content is protected !!