Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडसर्व सामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण होणार ४८४ रमाई घरकुल मंजूर

सर्व सामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण होणार ४८४ रमाई घरकुल मंजूर

कुक्कडगाव | सतिष गायकवाड
सर्वसाामन्यांना हक्काचा निवारा मिळावा या चांगल्या दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घरकुलाची योजना राबवली जाते. दरवर्षी घरकुल मंजुरी दिली जाते, २०२० मधील ४८४ रमाई घरकुलांना मंजुरी देण्यात आली. या घरकुलांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या घरकुलामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.
केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे. गोरगरीबांचा आर्थिकस्तर उंचावा हा शासनाचा दृष्टीकोन असतो. देशाची लाखो लोकांना आजही हक्काचा निवारा नाही. कित्येक लोक उघड्यावर राहतात. नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने घरकुल योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत दरवर्षी घरकुलाचा ठरावीक कोठा मंजूर केला जातो. त्यानुसार घरकुल बांधले जातात. बीड जिल्ह्यातही दरवर्षी शेकडो घरकुलांना मंजूरी दिली जाते. २०२० साली ४८४ घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. या घरकुलांच्या बांधकामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. दरम्यान रमाईचे १००८ घरकुल वेटींगवर ठेवण्यात आलेले आहेत. सदरील या घरकुलांना निधी उपलब्ध नसल्यामुळे हे घरकुल वेटींगवर आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना मंजूरी मिळणार आहे.

ज्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली त्यांचे बजेट शासनाकडे उपलब्ध आहेत. संबंधित पंचायत समितीच्या बीडीओंनी इंजिनिअरला आदेश देवून घरकुलाचे मार्क आऊट टाकण्याचेे आदेश द्यायला हवे. जेनेकरून घरकुलाच्या कामाला चालना मिळू शकते. आता हे मंजूर झालेले घरकुल नेमके कधीपासून सुरू होणार? असा प्रश्‍न ही लाभार्थ्यामध्ये उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!