Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप...

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी – जिल्हाधिकारी

गेवराई (भागवत जाधव)

तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयातील 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

georai 2

नवोदय निवासी विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट दिली यावेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. येथील नवोदय विद्यालयात 102 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून त्यासह 27 कर्मचारी देखील आहेत येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसह अध्यापक, कुटुंबीय आणि कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले असून त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य, एक आचारी व एक मेस

georai

कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकाच वेळी अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी जगताप यांनी नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक कर्मचारी आदींच्या कोरोना तपासणी साठी। आर.टी.पी.सी.आर.(rt-pcr) चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या विद्यार्थी वसतीगृहात क्वारंटाईन ठेवण्यात आले असून अध्यापक- कर्मचारी यांना नवोदय विद्यालय परिसरातील त्यांच्या निवासस्थानी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासह येथे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची देखील जिल्हाधिकारी जगताप यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गेवराई तहसीलदार सचिन खाडे गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...