Thursday, July 29, 2021
No menu items!
HomeUncategorizedपुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास परळ येथील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी युवती विरुद्ध तक्रार करण्यात आली. दरम्यान ही युवती कोण? तिने पुजाचा मोबाईल का पळविला? याबाबत चर्चा होत आहे.
पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. अद्याप पुजाच्या मृत्यू मागचे गुळ उकललेले नाही. त्यातच गुरुवारी पुजाची बहिणी दिव्यांगी लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला. दिव्यांगी सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभव कराड हे दोघे वॉकिंगसाठी परळी येथील हनुमान गड परिसरात गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता परत येत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून एक कॉल आला, ‘मला तुझी बहिण पुजा बद्दल बोलायचे आहे’, असे समोरून अनोळखी युवतीने तिला सांगितले. थोड्या वेळाने फाऊंडेशन शाळेजवळ भेटण्याचे त्यांचे ठरले. दिव्यांगी व सौरभ हे रात्री आठ वाजता शाळेजवळ आले, त्यानंतर त्या अनोळखी युवतीने त्यांना कॉल करून शाळेच्या दुसर्‍या गेटजवळ आले, तेथे तोंडाला स्कार्फ बांधलेली व काळ्या रंगाची जेरकिंग घालून एक मुलगी उभी होती. तिच्याशी बोलताना दिव्यांगीच्या मोबाईलवर तिचा भाऊ संग्राम याचा फोन आला. तो कॉल घेत असताना त्या अनोळखी युवतीने दिव्यांगीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला व दुसर्‍या गेटच्या दिशेने पळ काढला. या वेळी दिव्यांगी आणि सौरभने तिचा पाठलाग केला मात्र काही अंतरावर असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसून ती पळून गेली. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अनेक प्रश्‍नांची अद्याप उकल झालेली नसताना अचानक दिव्यांगीचे मोबाईल चोरी झाल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. चोरी करणारी युवती कोण? तिला काय हवे होते? यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!