Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडकेजकेज येथील रोजगार हमी घोटाळ्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती?

केज येथील रोजगार हमी घोटाळ्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती?

बीड (रिपोर्टर):- केज तालुक्यातील ६९ गावामध्ये रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता. अनेक कामे हे कागदावर केलेली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी एकाच दिवशी अधिकार्‍यांची टीम नियुक्त करून या सर्व बाबीची तपासणी केल्यानंतर यातील रोजगार सेवक, ग्रामसेवक, रोजगार हमी प्रकल्प अधिकारी आणि गटविकास अधिकारी या सर्वांना नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसांचे खुलासे आल्यानंतर या खुलाशाचा अभ्यास करून या दोषी अधिकारी कर्मचार्‍यांवर काय कारवाई करता येईल यासाठी लवकरच उच्चस्तरीय अधिकार्‍यांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे एका विश्‍वसनीय सुत्राकडून सांगण्यात आले आहे.
केज तालुक्यातील ६९ गावात रोजगार हमी योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल आहे. यामध्ये रोपवाटिका, रस्ते, बांधबंधिस्ती आदी कामे कागदावर करून कोट्यवधी रूपये उचलण्यात आले होते. अनेक गावामध्ये ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मजुरांचे एटीएम स्वत:कडे ठेवून हे पैसे उचलले होते. यासर्व बाबी चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांच्या टीमला कागदपत्रावरून दिसून आल्या होत्या. त्यामुळे यातील दोषी असणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वीच नोटीसा बजावून त्यांच्याकडून खुलासे मागवले होते. त्यांनी दिलेले खुलासे यांचे अवलोकन करून त्यांच्यावर काय कारवाई करण्यात यायला पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ अधिकार्‍यांची एक समिती नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त तथा लेखाधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश असेल मात्र अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते पुणे येथे उपचार घेत आहेत. ते या आजारातून बरे होवून रूजू झाले की या समितीला मुर्त स्वरूप येईल असेही जिल्हा परिषद मधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!