Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडएसटीची मालवाहतूक उद्यापासून महागणार

एसटीची मालवाहतूक उद्यापासून महागणार

मुंबई (रिपोर्टर):- वाढत्या डिझेल दरामुळे एस.टी. महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात प्रतिकिलोमीटर ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ८ मार्चपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. सुधारित दरानुसार प्रतिकि.मी. ४६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. सध्याचा दर हा प्रतिकि.मी. ४२ रुपये आहे.
टाळेबंदीत प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी एस.टी. महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. प्रवासी बसेसमध्ये काहीअंशी बदल करून मालवाहतुकीसाठी १ हजार ११९ वाहने तयार करण्यात आली आहेत. मालवाहतुकीमुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत असली, तरी डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. एस.टी.ला इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेलचा पुरवठा होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लिटर डिझेल लागते. डिझेल खरेदीसाठी महामंडळ वर्षाला ३ हजार कोटींची तरतूद करते.त्यापैकी २ हजार ८०० कोटी रुपये डिझेलवर खर्च होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मालवाहतुकीच्या दरात वाढ करत असल्याचे एस.टी. महामंडळाचे म्हणणे आहे. महामंडळाच्या १०० कि.मी.च्या आतील मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद आहे. प्रतिदिवस मालवाहतुकीसाठी ३ हजार ५०० रुपये भाडे निश्चित केले आहे. तसेच १०१ कि.मी. ते २५० कि.मी.पर्यंत प्रतिकि.मी. ४४, तर २५१ कि.मी.च्या पुढे ४२ रुपये प्रतिकि.मी. दर आकारण्यात येणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!