Thursday, July 29, 2021
No menu items!
HomeUncategorizedउद्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर होणार

उद्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर होणार


मुंबई (रिपोर्टर):- सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तू तू मै मै होत असतानाच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार असून सरकार समोर येत्या तीन दिवसात अनेक विषयांवर चर्चा आणि प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कोरोना काळातले हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी, विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत असून गेलं वर्ष आणि चालू वर्ष हे कोरोना महामारीच्या विळख्यात असल्याने सरकार समोर अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानाला सामोरे जाताना उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोनामुळे आर्थिक डबघाईचे मोठे संकट राज्यासमोर आहे. त्याचबरोबर कर रुपातून राज्याला जो केंद्राकडून पैसा येतो तो पैसाही केंद्र सरकार सातत्याने अडवत असल्याने अर्थमंत्र्यांना उद्या अर्थसंकल्प सादर करताना अनेक आव्हाने पेलावे लागणार आहेत. तर दुसरीकडे सरकारलाही विधानसभा अध्यक्ष निवडीपासून विरोधकांच्या अन्य प्रश्‍नांचे उत्तरे द्यावे लागणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!