Monday, April 19, 2021
No menu items!
Home बीड नगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ

नगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ

कर भरूनही लोकांचा थकबाकीमध्ये केला समावेश
शिरुर कासार (रिपोर्टर):- नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने शहरातील थकबाकीदार असलेल्या नागरिकांकडून वसुली मोहीम सुरू आहे.परंतु ज्या लोकांनी कर भरणा केला आहे अशा लोकांचीच नावे थकबाकी मध्ये आल्यामुळे नगरपंचायत कार्यालयाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.गत चार ते पाच दिवसांपासून मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात थकबाकी असलेल्या लोकांची नावे काढण्यात आली आहेत.नगरपंचायत कर्मचारी संबंधित लोकांकडे जाऊन थकबाकी वसूल करण्याचे काम करत आहेत.ज्यांनी थकबाकी जमा केली आहे आणि ज्यांच्याकडे रितसर कर भरणा केल्याच्या पावत्या आहेत अशा लोकांना नगरपंचायत नाहक त्रास देण्याचे काम करत आहे.लोकांकडे करभरणा केल्याच्या पावत्या आहेत परंतु नगरपंचायत कार्यालयात असलेल्या संबंधित रजिस्टरवर त्याची नोंद का घेण्यात आली नाही?हा प्रश्न उपस्थित होत आहे.नोंद न घेण्याचा उद्देश काय?सदरील रक्कम कोणाच्या खिशात तर गेली नाही ना?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.शहरातील व्यापारी लोकांच्या बाबतीत हाच प्रकार घडला असून त्यांनी पावत्या जपून ठेवल्यामुळे त्यांच्याकडे करभरणा केल्याचा पुरावा राहिला जर पावत्या नसत्या तर नाहक डबल स्वरूपात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता.नगरपंचायत कार्यालयात असलेल्या रजिस्टर आणि नोंदीवर कार्यालयीन प्रमुखांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून करभरणा केलेल्या लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हर्षद क्षीरसागर यांच्याकडे बाकी दाखवली
शहरातील कालिकादेवी महाविद्यालयाच्या इमारत कर भरणापोटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुत्र हर्षद क्षीरसागर यांच्याकडे एक लक्ष अठ्ठावीस हजार सहाशे दहा रुपये बाकी असल्याचे नगरपंचायत कार्यालयाने यादीद्वारे जाहीर केले आहे.सदरील महाविद्यालयाने एप्रिल महिन्यातच चेक द्वारे मागील बाकी असलेला करभरणा केला असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक महारुद्र डोंगरे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले असून महाविद्यालयाकडे फक्त चालू वर्षातील बाकी असल्याचे देखील ते म्हणाले.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...