Thursday, July 29, 2021
No menu items!
HomeUncategorizedपांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघात
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
पाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
बीड । रिपोर्टर
वडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार तर पाच जण गंभिर जखमी झाल्याची घटना आज रात्री 7.30 वाजता बीड- परळी रोडवर पांगरबावडी जवळ घडली. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून ते सर्व बीड शहरातील शाहुनगरमधील असल्याचे समजते.
बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी येथून प्रवाशी रिक्षा बीडकडे प्रवाशी घेवून येत होता. रिक्षा पांगरबावडी जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे जाणार्‍या ट्रक (क्र.एन. एच. 09 सी.व्ही. 9644) नेे रिक्षाला जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पीएसआय पवन राजपूत यांच्यासह पोलिसांनी धाव घेत जखमींना नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपचारासाठी पाठवले. याच ट्रकचालकाने घोडका राजूरी येथे एका दुचाकीला धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन जण जखमी झाल्याचे समजते.
मयत : तबसुम अकबर पठाण, सारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय 13), तम्मना अबजान पठाण (वय 10) मदिना पठाण (बीडशहरातील शाहुनगर भागातील रहिवाशी असल्याचे समजते)

जखमी : जाईबाई कदम (रा. कारळवाडी)
मुजीब कुरेशी (बीड)
आश्विनी
गोरख खरसाडे
सिध्दार्थ इंद्र शिंदे रिक्षाचालक

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!