Monday, April 19, 2021
No menu items!
Home बीड ना.धनंजय मुंडेंच्या खात्याला अर्थसंकल्पात मोठी तरतूद ना.मुंडेंमुळे जिल्ह्यातल्या तिर्थक्षेत्रांना येणार मोठा निधी

ना.धनंजय मुंडेंच्या खात्याला अर्थसंकल्पात मोठी तरतूद ना.मुंडेंमुळे जिल्ह्यातल्या तिर्थक्षेत्रांना येणार मोठा निधी

बीड (रिपोर्टर) राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील योजनांना महत्व देण्यात आले असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे विभागाच्या सर्वसाधारण योजनांसाठी 2675 कोटी तर अनुसूचित जातीसाठी 10635 असे एकूण 13310 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील विविध तिर्थक्षेत्रासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे हे खाते आल्यापासून त्यांनी या खात्याला अधिक न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ना.मुंडे हे सातत्याने प्रयत्नशील असतात. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रासाठी यावर्षी अर्थसंकल्पात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात ना.मुंडेंचा सिंहाचा वाटा आहे. सामाजिक न्याय खात्याअंतर्गत विविध योजनांसाठी 13310 कोटीचा निधी अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणा केली आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रला विशेष निधी उपलब्ध करून देणार-अजितदादा भगवानगड, नारायणगड, गहीनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार-अजितदादा स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन 10 रू. सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार अर्थसंकल्पात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग… सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास सर्वसाधारण योजनांसाठी 2675 कोटी तर अनुसूचित जातीसाठी 10635 रुपये असे एकूण 13310 कोटी रुपये निधी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी पासून प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सीबीएसई शाळा सुरू करून पथदर्शी प्रकल्प राबविणार तृतीयपंथीयांच्या स्वावलंबन व विकासासाठी स्वतंत्र बीजभांडवल योजनेची घोषणा स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन 10 रू. सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार व त्यानुसार दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विविध योजना एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी अद्ययावत मोबाईल/वेब अँपची निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या सर्व योजना व एकूण कार्यक्रमासाठी 150 कोटी रुपये अर्थ संकल्पात बीड जिल्हा भगवानगड, नारायणगड, गहीनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार व तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...