Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईमबार्शी रोडवर धाडसी चोरी,चार लाखाचा माल लंपास शिवाजीनगर पोलीसांनी केला पंचनामा

बार्शी रोडवर धाडसी चोरी,चार लाखाचा माल लंपास शिवाजीनगर पोलीसांनी केला पंचनामा


बीड (रिपोर्टर)ः- बार्शी रोडवर असलेल्या एका दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश करत आतील पितळी भांडे चोरून नेले. या भाड्यांची किम्मत अंदाजे चार लाखापर्यंत होती. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. चोरट्यांने माल नेण्यासाठी एखादया चार चाकी वाहनाचा उपयोग केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्‍वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर साई स्टील स्क्रॅप नावाचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या दुकानाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. या दुकानात पितळी भांड्याची मोड मोठ्या प्रमाणात होती. जवळपास ८ ते ९ पोत्यामध्ये पितळी मोड ठेवण्यात आली होती. ही सर्व पितळी मोड चोरट्याने चोरून नेली. मोड नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनांचा उपयोग केला असावा. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सकाळी जवकर यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती शिवाजी नगर पोलीसांना दिली. त्यानुसार ठाण्याचे पोलीस कर्मचारी पठाण, तुषार गायकवाड, शेख मोहसीन यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून शहरात चोरीच्या घटना वाढल्या. पोलीस प्रशासनाच्यावतीने (चार्ली) दुचाकीवर पेट्रोलींग केली जात असायची मात्र ति गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना पायबंद घालवण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी केली जावू लागली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!