Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeबीडधारूरबाजार बंद केले पण शेतकर्‍यांच्या मालाचे काय ?

बाजार बंद केले पण शेतकर्‍यांच्या मालाचे काय ?

किसान सभेने शिवाजी चौकात मोफत मेथीची भाजी वाटून शासनाचा केला निषेध
किल्ले धारूर (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात आठवडी बाजार बंद केल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.त्यामुळे शेतकर्‍यांची लुट व नुकसान टाळण्या साठी किसानसभेच्या वतीने शेतकर्‍यांचा मोफत भाजीपाला वाटप करण्यात आले व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत भाजीपाला विक्रीची सोय करण्याची मागणी तहसीलदार कडे करण्यात आली आहे.
कोरोना चा प्रादूर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा व सार्वजनीक कार्यक्रम बंदीचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.या आदेशा मुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.मेहनत करून खर्च करून पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत आहे नसता तोडून टाकावा लागत आहे.यामुळे शेतकरी गतवर्षी प्रमाणेच पुन्हा अडचणीत आला आहे. या सर्व बाबी मुळे किसानसभेच्या वतीने शेतकर्‍याची होणारी लुट व नुकसान टाळण्या साठी प्रशासनाने शेतकर्‍यांचा भाजीपाला विक्री साठी सुविधा करावी आशी मागणी किसानसभेच्या वतीने करत. शेतकर्‍यांचे मेथी शेवगा शेंग यांचे प्रतीकात्मक धारूर बसस्थानका समोर मोफत नागरीकाना वितरीत करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला .यावेळी किसानसभेचे मोहन लांब काशीराम सिरसट संजय चोले डा अशोक थोरात आदी व शेतकरी उपस्थीत होते.
तहसीलदारला या संदर्भात किसानसभेच्या वतीने निवेदन देण्यात आले कोरोना मुळे शेतकरी सःकटात आहे गतवर्षी या काळातच लाकडाऊन झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांन मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागला व खर्च हि निघाला नाही. यावर्षी पुन्हा आठवडी बाजार बंद करून भाजीपाला विक्री हि बसून करून दिली जात नाही यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला इहे या शेतकर्‍यांचे भाजीपाला विक्री साठी प्रशासनाने नियोजन करावे आशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शेतकर्‍यांचे भाजीपाल्याचे किसान सभेने केलेले मोफत वाटप हा आज चर्चेचा मुद्दा ठरला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!