Sunday, April 18, 2021
No menu items!
Home देश विदेश निकिता जेकब, शंतनू मुळुक यांच्या अटकेला १५ मार्चपर्यंत मनाई

निकिता जेकब, शंतनू मुळुक यांच्या अटकेला १५ मार्चपर्यंत मनाई

‘टुल किट’
प्रकरणात दिल्ली
न्यायालयाचा निर्णय

दिल्ली (वृत्तसेवा)दिल्लीच्या शेतकरी आंदोलनासंदर्भात पर्यावरण कार्यकर्ते ग्रेट थम्बर्गला पाठविण्यात आलेल्या टुल किट प्रकरणात निकिता जेकब व शंतनू मुळूक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने १५ मार्चपर्यंत अटकेला मनाई केली आहे.
टुल किट प्रकरणात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले वकील निकिता जेकब व शंतनू मुळूक यांनी दिल्ली न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर काल न्यायमुर्ती धर्मेंद्र राणा यांच्या समोर सुनावणी झाली. निकिताच्या वतीने रेबेका जॉन तर शंतनूच्या वतीने विरेंद्र ग्रोव्हर यांनी बाजू मांडली. याच प्रकरणात दिल्ली पोलीसांनी बंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिच्या विरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तिला जामीन दिला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेट थम्बर्ग यांना पाठविण्यात आलेल्या टुल किट दिशा निकिता व शंतनू यांनीच बविलयचा आरोप आहे. परंतु हा आरोप शंतनूने फेटाळला आहे. आपण टुल किट बनवली परंतु ती आपल्याला विश्वासात न घेता बदलण्यात आली, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....