Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडव्यापार्‍यांच्या कोरोना चाचण्या सुरू, बारा वाजेपर्यंत दोन पॉझिटिव्ह

व्यापार्‍यांच्या कोरोना चाचण्या सुरू, बारा वाजेपर्यंत दोन पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ११० नवे कोरोना बाधीत

बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची लक्षणीय वाढ पाहता जिल्हाधिकारी रविद्र जगताप यांनी व्यापार्‍यांसाठी कोरोना अँटीजेन चाचणी बंधनकारक केल्यानंतर आज दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील चार केंद्रांवर केवळ १३७ व्यापार्‍यांची चाचणी झाली होती. यामध्ये दोन व्यापारी बाधीत आढळून आले तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात आज तब्बल ११० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून बीड शहरात सर्वाधिक ५७ रुग्ण सापडल्याने चिंतेमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १ हजार २९४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९ हजार ६३८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची लक्षणीय वाढ होत असल्याने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हासिधकारी रविंद्र जगताप यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. शहरातील व्यापार्‍यांना अँटीजन चाचणी बंधनकारक करत आधी कोरोना चाचणी करा मगच दुकाना उघडा असे स्पष्ट सांगितल्यानंतर आज शहरातील चंपावती विद्यालय, राजस्थानी विद्यालय, अशोकनगर जिल्हा परिषद शाळा, शासकीय आयटीआय या ठिकाणी व्यापार्‍यांच्या अँटीजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या. आज दुपारी १२ वाजेपर्यंत १३७ व्यापार्‍यांनी चाचण्या करून घेतल्या असून यामध्ये दोन व्यापारी बाधीत आढळले आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्य विभागाने काल बीड जिल्ह्यात विविध तालुक्यातून १०६३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून यामध्ये ११० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील अंबाजोगाई तालुक्यात १०, आष्टी ११, बीड ५७, धारूर १, गेवराई ५, केज ४, माजलगाव १३, परळी ४, पाटोदा २, शिरूर १ आणि वडवणी तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोरोना सेंटरमध्ये तब्बल १२९४ बाधीतांवर उपचार सुरू असून आजपर्यंत बीड जिल्ह्यात १९ हजार ६३८ जणांना कोरोनाची बाधी झाली होती. बरे होणारे रुग्ण १८ हजार ४९० एवढे आहेत.

उद्या या व्यापार्‍यांच्या होणार चाचण्या
व्यापार्‍यांच्या अँटीजेन चाचण्या करणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले असून रोज वेगवेगळ्या संघटनेमधील व्यापार्‍यांच्या चाचण्या केल्या जातात. उद्या अकरा मार्च रोजी जालना रोड व्यापारी संघटना, बांगडी विक्रेता संघटना, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल, मोबाईल विक्रेते, सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स संघटना, कटलेरी-स्टेशनरी संघटना, सीपीडीए असोसिएशन, चिकन, मटन, मच्छी विक्रेते, धोंडीपुरा, टिळक रोड व्यापारी संघटना यांच्या चाचण्या होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!