Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडपेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन अ‍ॅड.हेमा पिंपळे आल्या घोड्यावर न्यायालयात

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन अ‍ॅड.हेमा पिंपळे आल्या घोड्यावर न्यायालयात


बीड (रिपोर्टर):
पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांत संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अ‍ॅड.हेमा पिंपळे यांनी आज इंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ आगळे वेगळे आंदोलन केले. त्या न्यायालयात घोड्यावर बसून आल्या. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसचे चार दिवसाला भाव वाढवत आहे. या वाढत्या भाववाढीमुळे सर्वसामान्या त्रस्त झाला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांना वाहने परवडत नाहीत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी दरवाढीच्या निषेधार्थ आगळेवेगळे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून त्या न्यायालयात घोड्यावर बसून आल्या. या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!