Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमास्क न घालणार्‍यांना दंड, केजमध्ये नगरपंचायतकडून कारवाई बीडमध्येही चौकाचौकात पोलिसांची कारवाई सुरू

मास्क न घालणार्‍यांना दंड, केजमध्ये नगरपंचायतकडून कारवाई बीडमध्येही चौकाचौकात पोलिसांची कारवाई सुरू


केज/बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, अशा सक्तीच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात असल्या तरी अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास काल केज शहरामध्ये करण्यात आली. ही कारवाई केज नगरपंचायत व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. यापुर्वीही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली होती. मात्र लोक मास्क वापरत नसल्याने पुन्हा प्रशासनाला कारवाई करावी लागली. दरम्यान, बीड शहरामध्येही चौकाचौकात मास्क न वापरणार्‍यांविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात दररोज शंभर व त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, अशा सक्तीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्याला दिलेल्या आहेत. तालुकास्तरावर मास्क न वापरणार्‍या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाते. कालपासून केज शहरामध्ये कारवाई करण्यात येऊ लागली. अनेक दुचाकीस्वार मास्कचा वापर न करताच बाहेर प्रवास करत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तींना पकडून त्यांच्याकडून दंडात्मक वसुली केली जात आहे. यापुर्वीही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली होती मात्र यातून लोकांनी बोध घेतला नसल्याने पुन्हा आता कारवाईला सुरुवात करावी लागली.

माजलगावसह इतर ठिकाणीही कारवाई
बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी बाहेर फिरणारे लोक मात्र हलगर्जीपणा करून कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहेत. शहराच्या ठिकाणी लोक शंभर टक्के मास्कचा वापर करत नसल्याने माजलगावसह इतर नगरपालिकांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे.

Most Popular

error: Content is protected !!