Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडशंभू महादेवा, कोरोनाची ईडापिडा जाऊ दे! जिल्ह्यातील शिवालय परिसरात पोलीसांचा बंदोबस्त

शंभू महादेवा, कोरोनाची ईडापिडा जाऊ दे! जिल्ह्यातील शिवालय परिसरात पोलीसांचा बंदोबस्त


बंद मंदिराच्या दारात काहींनी वाहिले बेलफुल
बीड (रिपोर्टर)- कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातले शिवालय बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर आज महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्हाभरातल्या शिवालयात भाविकांनी गर्दी करू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त दिसून आला. अशा स्थितीतही भाविकांनी काही ठिकाणी मंदिराच्या पायर्‍यांवर दर्शन घेतले.

159430989 719712328711562 5959838307824891156 n


बीड जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्हाभरातले सर्व शिवालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात भरणारी यात्रा रद्द करण्यात आली. त्याचबरोबर चाकरवाडी येथील यात्राही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शिवरात्रीच्या दिवशी परळी वैजनाथ, चाकरवाडी, कपिलधार यासह जिल्हाभरातले प्रमुख शिवालयांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड येथील सोमेश्वर मंदिर बंद ठेवून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. सोमेश्वर मंदिर आणि अन्य शिवालयात काही भाविकांनी हजेरी लावून दारात पायर्‍यांवर बेल फुल वाहत शंभु महादेवाचे दर्शन घेतले. कोरोनाची ईडापिडा जाऊ दे असे म्हणत शंभू महादेवाकडे अनेकांनी साकडे घातले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!