Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनातिसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ६ व्यापारी पॉझिटिव्ह

तिसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ६ व्यापारी पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरातील व्यापार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. आज तिसर्‍या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत १४९ व्यापार्‍यांच्या चार बुथवर टेस्ट झाल्या. यामध्ये सहा व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शहरातील अशोकनगर जिल्हा परिषद शाळेत ३६ व्यापार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आला नाही. राजस्थानी विद्यालयातील केंद्रात ४६ व्यापार्‍यांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये १ पॉझिटिव्ह आढळून आला. चंपावती शाळेत ४५ व्यापार्‍यांच्या टेस्ट झाल्या. त्यामध्ये दोन व्यापारी पॉझिटिव्ह आले. आयटीआय सेंटरमध्ये २२ व्यापार्‍यांच्या तपासण्या झाल्या त्यामध्ये ३ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!