Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

कोरोना लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

केजमध्ये २६०० नागरिकांनी घेतली लस, गेवराईत ३६१४ जणांना दिली लस
केज/बीड/गेवराई (रिपोर्टर):- कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर आधी सर्व कर्मचार्‍यांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. १ मार्चपासून ६० वर्षाच्या पुढील आणि गंभीर आजारी असलेल्या ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २६०० रुग्णांना लस देण्यात आली. बीडच्या जिल्हा रुग्णालयात दररोज अनेकांना लस दिली जातेय. लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. गेल्या क वर्षापासून जगामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. कोरानाची लस बाजारात आल्यानंतर सर्वप्रथम शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांच्या पुढील वयोवृद्धांना व ४५ वर्षेे पेक्षा जास्त असणार्‍या गंभीर रुग्णांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयासह तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयातून लस दिली जातेय. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २६१५ रुग्णांना लस देण्यात आली. लस घेण्यासाठी दररोज ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येते. दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयात ६३ जणांनी लस घेतली होती. गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३६१४ जणांना लस दिली असल्याची माहिती अधीक्षक डॉ. चिंचोले यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!