Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमधारुर घाटात पुन्हा भीषण अपघात एक जागीच ठार एक जखमी

धारुर घाटात पुन्हा भीषण अपघात एक जागीच ठार एक जखमी

किल्ले धारूर (रिपोर्टर)- किल्ले धारूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून आज दि.१२ शुक्रवार रोजी सकाळी ६:३० च्या दरम्यान कार व दुचाकीचा भीषण अपघात आरणवाडी जवळील घाटात घडला आहे.
या अपघातात एक जण ठार तर एक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली किल्ले धारूर राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर आज सकाळी सहाच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. एम एच २० एफ पी ४१३२ ही कार औरंगाबाद येथून लातूरकडे जात असताना तेलगाव कडे जाणार्या मोटर सायकलला धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला मयत शैलैश पवार २५ वर्ष रा गणेशनगर तांडा ता.जिंतुर असल्याचे कळते जखमीला किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र या बालकासह प्रवीण कातळे, महारुद्र कातळे या दोघांचा समावेश होता. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.
काल ची घटना ताजी असतानाच तालुक्यांमध्ये ही दुसरी घटना घडली आहे काल तेलगाव येथे बीड परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे दि.४ मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघा होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहे. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासन तास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.

Most Popular

error: Content is protected !!