Home कोरोना बीड जिल्ह्यासाठी मोठी बातमी, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पान टपर्‍या बंद सायंकाळी 7...

बीड जिल्ह्यासाठी मोठी बातमी, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पान टपर्‍या बंद सायंकाळी 7 ते सकाळी 7 बंद राहणार


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेन् दिवस वाढत असल्याने त्यावर प्रतिबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पान टपरी इत्यादी पूर्णत: बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 18 मार्च पासून जिल्ह्यातील सर्व मंगलकार्यालय फंक्शनहॉल अनिश्‍चित बंद करण्यात आले आहे.


आज जिल्हाधिकारी यांनी बंद बाबतचा निर्णय घेतला. हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पान टपरी इत्यादी पूर्णत: बंद राहणार असून 18 मार्च पासून मंगल कार्यालय फंक्शनहॉल अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करुन विक्री करावी व सर्व दुकानदार त्यांचे कामगार यांची प्रत्येक 15 दिवसांनी कोव्हिड चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक राहील.

दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालये वगळून दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करेल, असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version