Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 181 बीडमध्ये आढळले 82 रुग्ण

आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 181 बीडमध्ये आढळले 82 रुग्ण

बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज जिल्हाभरात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बीड शहरात 82 रुग्ण आहेत. यामध्ये शिवाजीनगर, आदर्शनगर, सहयोगनगर, क्रांतीनगर, गणपतीनगर यासह अन्य भागातील रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
काल तपासणीसाठी 1691 जणांचे स्वॅब पाठवले होते. त्यामध्ये 181 पॉझिटिव्ह तर 1510 निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईमध्ये 33, आष्टी 18, बीड 82, गेवराई 12, केज 12, माजलगाव 5, परळी 7, पाटोदा 2, शिरूर 5 तर वडवणीत 5 रुग्ण आढळून आलेले आहेत. बीड शहरासह तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. यामध्ये सहयोगनगर, शिवाजीनगर, अशोकनगर, संत नामदेव नगर, चर्‍हाटा फाटा यासह अन्य भागातील रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

व्यापार्‍यांच्या टेस्टमध्ये 14 पॉझिटिव्ह
गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरातील व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. आज एकूण 271 व्यापार्‍यांची आतापर्यंत चाचणी झाली असून यामध्ये 14 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशोकनगर येथील केंद्रावर 50 रुग्णांची टेस्ट झाली त्यात 1 पॉझिटिव्ह, राजस्तानी विद्यालयात 121 जणांची टेस्ट घेण्यात आली त्या ठिकाणी 2 पॉझिटिव्ह आले, चंपावती शाळेत 65 जणांची टेस्ट झाली 6 पॉझिटिव्ह तर आयटीमध्ये 35 व्यापार्‍यांची टेस्ट झाली तेथे 5 जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!